सामाजिक उपक्रम राबवत शिक्षकांने केला वाढदिवस साजरा

लोहारा ( जि.धाराशिव ) : आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कास्ती बु येथील पदवीधर शिक्षक शेख एस एम यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला. शेख यांनी त्यांच्याकडुन वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळुन शाळेतील 250 विद्यार्थ्यांना पिण्याच्‍या पाण्याची बॉटलचे वाटप केले.

यापुर्वीही त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते परवेज तांबोळी,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळीराम साबळे, कार्यालयीन विस्तार अधिकारी बेशकराव साहेब, लोहारा बीट विस्तार अधिकारी सुभाष चव्हाण ,केंद्रप्रमुख मक्तेदार, नयन शेख, तालुका शिक्षक संघ तालुकाध्यक्ष सुदर्शन जावळे सर, तालुका उपाध्यक्ष श्री मेघराज कदम, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना राज्य  समन्वयक श्र विकास घोडके, शाळेचे मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, शिक्षक एकनाथ कदम, व्यंकट पोतदार, शंकर काळे, बालाजी सोमवंशी,नितीन कदम, प्रविण अगंबरे , शिवाजी पोतदार, नितीन वाघमारे , रसुल शेख, कांबळे सर, केशर वाघमारे, मंडोदरी कोळी, आशपाक शेख यांच्यासह र्व विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी शेख यांनी उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा विद्यार्थ्यांना जाणवू नयेत.सर्वांना बाटलीत पाणी भरून आणता यावे. यासाठी आज विद्यार्थ्यांना पाणी बाटली वाटप केले आहे.असे सांगितले यावेळी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!