लोहारा शहरात गाव चलो अभियान अंतर्गत नागरिकांशी संवाद

लोहारा (धाराशिव ) : लोहारा शहरात येथे 9 फेब्रुवारी 2024 रोजी लोहारा तालुका भाजपाच्या वतीने गाव चलो अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून उमरगा, लोहारा विधानसभा प्रमुख तथा प्रवासी कार्यकर्ता राहुल दादा पाटील, भाजपा महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा तथा नगरसेविका सौ.आरती सतिश गिरी उपस्थित राहुन घरोघरी फिरुन पंतप्रधान मोदी व राज्य सरकारनी सर्वसामान्य जनतेसाठी राबविलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती सांगुन संवाद साधला. यावेळी श्रावणी थोरात, प्रशांत माळवदकर, अनिकेत माटे, शुभम गोसावी, बबलू नारायनकर, योगेश गिरी, शिवा थोरात, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा ग्राम संयोजक बाबा सुंबेकर, रमेश रोडगे, नरहरी बाभळे,, पाशू शेख, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.