सक्तीची महसूल वसुली थांबवा ; शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी

धाराशिव : गाव कामगार तलाठी यांच्यामार्फत सुरू असलेली सक्तीची महसूल वसुली शेतसारा घेणे थांबवावे अशी मागणी शेतकऱ्याच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याकडे केली असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्ते अनिल (दादा) जगताप यांनी शुक्रवारी दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करणे संदर्भात काही शासन निर्णय व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. खरीप 2023 च्या हंगामातील परिस्थितीच्या आधारे 40 तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.
राज्य शासनाने दुष्काळ घोषित करण्यात आलेल्या तालुक्यातील व महसूल मंडळातील शेतकऱ्यांना एकूण आठ प्रकारच्या सवलती जाहीर केल्या त्याच प्रामुख्याने जमीन महसुलात सूट, पीक कर्जाचे पुनर्गठन ,शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विज बिलात 33.5% सूट ,शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी इत्यादी सवलतींचा समावेश आहे.
असे असले तरी गाव कामगार तलाठी यांच्याकडू शेतकऱ्याकडून महसुली वसुली सुरू होती विनंती करून ही ती थांबवण्याचे कामगार तलाठी नाव घेत नव्हते म्हणून अखेर जिल्हाधिकारी कार्यालय गाठून शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह निवासी उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले यावर तातडीने सर्व संबंधित तलाठ्यांना सूचना देऊन महसुली वसुली थांबवण्यात येईल असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले आश्वासित केले.
जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचा दुष्काळ असून राज्य शासनाने 31 ऑक्टोबर 2023 रोजी शासन निर्णय काढून लोहारा, वाशी, धाराशिव या तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळी तालुक्यामध्ये समावेश केला आहे इतरही सत्तावीस महसुलाचा महसूल मंडळाचा दुष्काळी यादीत समावेश आहे मात्र शेतकऱ्याकडून शेत वसुली सुरू आहे या विरुद्ध निवासी उपजिल्हाधिकारी यांना अवगत केले त्यांनी तातडीने अशी वसुली थांबवण्यात येईल असे आश्वासित केले.
-
अनिल जगताप ,सामाजिक कार्यकर्ते धाराशिव