लोहारा शहरातील अतिक्रमण धारकांनी आवश्यक दस्ताऐवजासह आपले अर्ज नगरपंचायतकडे 3 दिवसात द्या

लोहारा : नगर पंचायत लोहारा बु. येथील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, खाजगी शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या पण ज्यांची नावे मालमत्ता कर आकारणी रजिस्ट्ररला नोंद नाहीत. अशा सर्व अतिक्रमण धारकांनी आवश्यक दस्ताऐवजासह उदा. नळ जोडणी, लाईट बील, रेशन कार्ड इत्यादी दस्ताऐवजासह आपले अर्ज पुढील तीन दिवसाच्या आत लोहारा नगर पंचायत कार्यालयात सादर करावेत. असे अवाहन मुख्याधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.