इंग्लिश स्कूल मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा

 

लोहारा ( जि.धाराशिव ) : धानुरी येथील विद्यामाता स्कूलमध्ये हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले. त्यामध्ये संगीत खुर्ची, धावणे, उखाणे व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये मोठ्या उत्साहाने बहुसंख्य महिला या स्पर्धांमध्ये भाग घेतल्या,अनेक बक्षीसे मिळवल्या.संगीत खुर्ची खेळताना उखाणे घेताना व धावताना बायका अगदी लहान होऊन मनमोकळेपणाने हे सर्व खेळ खूप चांगल्या प्रकारे खेळला व खूप सारा आनंद लुटला हे सर्व खेळ खेळत असताना, सर्व बायकांना आपले लहानपण आठवले व त्यात रमत- रमत बायका आपले बालपण पुन्हा एकदा जगल्या. तसेच वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता आजच्या पालकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या या विषयावरती खूप चांगल्या प्रकारे महिलांनी आपले मत मांडले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा दयानंद सोलापुरे (हावळे) यांनी “मी पालक म्हणून घडू कसा” यावर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे “सूत्रसंचालन” हरून हेडडे व अश्विनी आळंगे यांनी केले व आभार आशा चौरे यांनी मानले, व तसेच सुवर्णा शिंदे, ज्योती साठे शिवमाला हुडगे ,प्रतीक्षा गिराम,अस्मिता म्हमाने, रोहिणी यादव,गीता चिकुंद्रे,सोनाली अलमले, अश्विनी वाघमारे, वैशाली कारभारी, फराना शेख, अश्विनी खांडेकर, साबिया केळगावे, शितल कदम, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सर्वांमुळे हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व नियोजनबद्ध पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!