किल्लारी ( ता.औसा ) :- प्रशांत नेटके
तपसे चिंचोली ते लामजना रस्त्यावरील काका येरनूळे यांच्या शेतालगत असलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठे भगदाड पडल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
तपसे चिंचोली ते लाजमना रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मोटारसायकल, ऑटो, उसाची ट्रॅक्टर ,ट्रक नेहमी याच मार्गावरून जातात. गाडवेवाडी,लाडवाडी ,गोटेवाडी, तपसे चिंचोली या भागातील नागरिक लामजना येथे येण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. दरम्यान, काका येरनूळे यांच्या शेतालगत असलेल्या पुलाच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने अपघातसत्र सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हा खड्डा पडलेला आहे. या भागातील नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे संबंधित पुलाच्या दुरुस्तीची मागणी करत आहेत. या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनांचा खड्ड्यात रात्री-अपरात्री अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बळी घेतल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांच्या वतीने उपस्थित केला जात आहे.
Back to top button
error: Content is protected !!