लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी अॅड. देविदास जाधव तर उपाध्यक्षपदी अॅड. संध्याराणी भुसने तिगाडे यांची निवड बिनविरोध करण्यात आली आहे.
लोहारा तालुका विधीज्ञ मंडळाची वार्षीक पदाधिकारी निवडीची बैठक घेण्यात आली. यात सन २०२४ च्या वार्षीक कार्यकारणीच्या पदाधिकारी यांची निवड खालीलप्रमाणे करण्यात आली.अध्यक्षपदी अॅड. देविदास जाधव, उपाध्यक्षपदी अॅड. संध्याराणी आर. भुसने तिगाडे, सचिव अॅड. दादासाहेब जानकर, सहसचिव अॅड. माधव गव्हाळे तर कोषाध्यक्षपदी अॅड. अतुल ए. कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. सदरच्या निवडी या खेळी मेळीच्या वातावरणात बिनविरोध करण्यात आल्या सदर बैठकीस विधीज्ञ मंडळाचे सदस्य अॅड. दादासाहेब पाटील, अॅड. पंडीत मुसांडे, अॅड. सागर पणुरे, अॅड. सत्यवान अडसुळे, अॅड. रामदास जाधव, अॅड. विजया गुंड, अॅड. एस. पी. शेख, अॅड. बी. के. भुजबळ, अॅड. एम. यु. जट्टे, अॅड. एम. एस. वचने-पाटील, अॅड. के. डी. मोरे, अॅड. एम. व्ही. साठे, अॅड. टी. एस. मोरे, अॅड. डी. एम. जाधव, अॅड. एस. बी. कदम मार्डीकर, अॅड. आर. आर. भोंडवे, अॅड. एस. एन. बादुले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली व शेवटी अभिनंदनाचा ठराव घेवून नुतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
HTML img Tag
Back to top button
error: Content is protected !!