” चोरीच्या 2 मोटरसायकलसह आरोपी गजाआड ”

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखा :- फिर्यादी नामे-गिरीश बजरंग कलशेट्टी, वय 28 वर्षे, रा. कवठा, ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000 ₹ किंमतीची रॉयल इनफिल्ड कंपनीची क्लासीक 35 बुलेट मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 4133 ही दि. 13.01.2024 रोजी 01.00 ते 06.30 वा. सु. गिरीश कलशेट्टी यांचे संध्या बियर बारचे समोरुन नारंगवाडी शिवार येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गिरीश कलशेट्टी यांनी दि.17.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे गुरनं 32/2024 कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. तसेच पोलीस ठाणे अहमदपुर हद्दीतील अंदाजे 70,000₹ किंमतीची एक काळ्या रंगाची होडां युनिकॉर्न कंपनीची मोटरसायकल ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले बाबत पोलीस ठाणे अहमदपुर येथे गुरनं 10/2024 कलम 379 भा.द.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने हे माला विषयी गुन्ह्यातील आरोपींची माहिती घेत सरकारी वाहनाने पेट्रोलिंग करीत पोलीस ठाणे वाशी हद्दीतील परधी फाटा येथे आले असता त्यांना गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गोलेगाव पारधी पिढी येथील ईसम नामे- भिमा झुबंर काळे, रा. पारधी पिढी गोलेगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी चोरुन आणल्या आहे अशी बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हेशाखा पोलीस पथकाने लागलीच गोलेगाव पारधी पिढी येथे जावून पाहिले असता एक युनिकॉर्न व एक बुलेट अशा दोन गाड्या मिळून आल्या. त्या गाड्याजवळ 1) भिमा झुंबर काळे रा. पारधी पिढी गोलेगाव ता. वाशी, 2) प्रकाश उर्फ ढाण्या नाना पवार रा. लक्ष्मी पारधी पिढी तेरखेडा ता. वाशी असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून नमुद गाड्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी आम्ही व इतर एक इसम यांनी नमुद गाड्या चोरी केल्याची कबुली दिल्याने दि.28.01.2024 रोजी नमुद दोन आरोपीस ताब्यात घेवून त्यांचे कडून अंदाजे 1,10,000 ₹ किंमतीच्या दोन मोटरसायकल जप्त केल्या. सदर आरोपीस चोरीच्या नमूद मोटारसाकलसह पुढील कारवाईस्तव उमरगा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे यांच्या आदेशावरुन सपोनि श्री. कासार, पोउपनि श्री संदीप ओहोळ सफौ/ काझी, पोहेकॉ/ जानराव, शौकत पठाण, पठाण, काझी, वाघमारे, पोना/ जाधवर चालक पोलीस अमंलदार- अरब यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!