राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

लोहारा : आज १२ जानेवारी रोजी शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री. अभिजित लोभे, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य डॉ. दौलतराव घोलकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की राजमाता जिजाऊ यांनी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची प्रेरणा दिली तशी प्रेरणा आजच्या मातांनी आपल्या मुलांना देण्याची गरज आहे तसेच स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना स्वाभिमान व उच्च निती मूल्य यांची जी शिकवण दिली ती आत्मसात करण्याची गरज आहे. या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!