समाजाच्या आरक्षण मागणीसाठी कॉग्रेसच्या नगरसेवकांचा राजीनामा

 

लोहारा (जि.धाराशिव) : मराठा समाजाला सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांचे बेमुदत उपोषण सुरु असून राज्य शासनाने दुर्लक्ष करत असल्याने लोहारा शहरातील कॉग्रेसचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी गुरुवारी नगरसेवकपदाचा राजीनामा कॉग्रेसचे गटनेते अरीफ खानापुरे यांच्या सुपुर्त केला आहे.
लोहारा तहसिल कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरु असून यात रोज तालुक्यातील एक गाव सहभागी होत आहे. गुरुवारी या साखळी उपोषणात मोघा (बु ) व मोघा (खुर्द) गावाचा समावेश होता. याप्रसंगी साखळी उपोषणाला पाठींबा दर्शवित कॉग्रेसचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी गुरुवारी नगरसेवकपदाचा राजीनामा कॉग्रेसचे गटनेते अरीफ खानापुरे यांच्या सुपुर्त केला आहे. याप्रसंगी मराठा समाज बांधव मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!