प्रहार जनशक्ती पक्षाचा मराठा समाजाच्या आरक्षण मागणीला जाहीर पाठींबा

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील तहसिल कार्यालयासमोर मराठा समाजाच्या वतीने आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाला प्रहार जनशक्ती पक्ष वतीने गुरुवारी जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दयानंद राठोड, उमरगा – लोहारा विधानसभा प्रमुख रियाज खडीवाले,लोहारा शहर प्रमुख सुजित पोतदार ,उत्तरेश्वर उपरे,हणमंत कुंभार,भरत पाटील, आनंद सुरवांशी,शुभम जाधव, गोपाळ गोरे,राजेंद्र जाधव, महादेव सूर्यवंशी,बालाजी जाधव,किरण चिंचोले, सोपान शिंदे यांच्यासह आदी उपस्थित होते.