195 कोटी रुपयांची याचिका दाखल – याचिकाकर्ते अनिल जगताप

धाराशिव : खरीप 2022 मधील पिक विमा रक्कम नुकसानीच्या व्याजासाठी राज्य तक्रार निवारण समितीकडे 195 कोटी रुपयांची याचिका दाखल केल्याची माहिती याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी दिली आहे.
यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की 2020 मध्ये धाराशिव जिल्ह्यातील नऊ लाख 48 हजार 990 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता त्यावर्षी अतिवृष्टी सतत च्या पावसाने प्रचंड नुकसान होऊनही 72 तासाचा तांत्रिक मुद्दा पुढे करून पीक विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील केवळ79 हजार शेतकऱ्यांना केवळ 56 कोटी रुपयाचे वाटप केले होते.
कंपनीच्या या मनमानी विरुद्ध धाराशिव जिल्ह्यातून छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात तीन याचिका दाखल झाल्या याची तीनही याचिकेवर एकत्रित निकाल देताना निकाल देताना उच्च न्यायालयाने प्रति हेक्टर 18 हजार रुपये प्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 544 कोटी रुपयांचे आदेश दिले होते.
प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर देखील तोच निकाल कायम ठेवून जिल्हाधिकारी यांच्या निगराणीखाली 544 कोटी रुपयांचे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप आदेश दिले होते मात्र पीक विमा कंपनी ते मानत नव्हती म्हणून नंतर अवमान याची का दाखल झाली. दरम्यानच्या काळात कंपनी उच्च न्यायालयात गेल्यानंतर उच्च न्यायालयाने दीडशे कोटी रुपये भरून तर जिल्हाधिकारी यांच्याकडे 12 कोटी रुपये भरून हे प्रकरणाला स्थगिती दिली होती.
या प्रकरणात आत्तापर्यंत 376 कोटी रुपये वाटप झाले असून आणखी 168 कोटी रुपये येणे बाकी आहे त्यासाठी उच्च न्यायालयात 7 जानेवारी ही अंतिम सुनावणी ची तारीख ठेवली आहे. आजही उच्च न्यायालयात कंपनीचे 75 कोटी रुपये जमा आहेत.
मात्र या सर्व प्रक्रियेत शेतकऱ्यांना खरीप 2020 मधील नुकसान भरपाई यांच्या हक्काचे 544 कोटी रुपये येणे असताना देखील पिक विमा कंपनीने ते दिले नाहीत म्हणून सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी पिक विमा शासन निर्णय दिनांक 29 जून 2020 मधील परिपत्रकानुसार कंपनीची भूमिका व जबाबदारी अंतर्गत २५ क मधील मुद्दा क्रमांक 21 अंतर्गत जर पिक विमा कंपनीने नुकसान भरपाईची रक्कम प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दोन आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना नाही दिली तर 12 टक्के दराने विलंब शुल्का सहित नुकसान भरपाई देण्याची तरतूद असून या मुद्द्याचा आधार घेत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे 22 डिसेंबर रोजी याचिका दाखल केली आहे लवकरच सुनावणी होऊन निकाल अपेक्षित आहे. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानी पोटी 2020 मध्येच 544 कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते मात्र त्यांच्या हक्काच्या पैशापासून तीन वर्ष वंचित ठेवून विलंब केल्याबद्दल याचिका दाखल केली आहे.
व्याज मागणीसाठी राज्य तक्रार निवारण समितीकडे केलेली ही राज्यातील पहिलीच याचिका आहे.
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्याचे विविध पिक विमा कंपन्याकडून 20 ते 23 मधील जवळपास 1500 हजार कोटी रुपये येणे बाकी आहे. शेतकऱ्यांना ही रक्कम वसूल करून देण्यासाठी मी संघर्ष करत आहे ज्या कंपन्या शेतकऱ्याचे नुकसान भरपाई देण्यास विलंब करतील त्यांना व्याजासह शेतकऱ्यांना रक्कम द्यावीच लागेल.
अनिल जगताप, 2020 चे याचिकाकर्ते