शेतकऱ्यांची दैन्यावस्था संपविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे – साहित्यिक प्रा. इंद्रजीत भालेराव

उमरगा ( जि.धाराशिव ) : – स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांची दैन्यावस्था कमी करण्यात येथील शासन व्यवस्था अपयशी ठरली आहे अशी खंत सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.इंद्रजित भालेराव यांनी व्यक्त केली.ते येथे स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित महात्मा ज्योतिबा फुले स्मृती पुरस्काराच्या वितरण समारंभ प्रसंगी बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मल्लिनाथ मलंग हे होते. प्रा.भालेराव पुढे म्हणाले आज देशात परिपूर्ण मूल्यमापन करणारी शिक्षण पद्धती अस्तित्वात नाही .ती असणे आवश्यक आहे.तसेच प्रत्येक माणसाकडे काही अंगभूत कौशल्ये ,गुण असतात त्या कौशल्य गुणांना वाव देणारी शिक्षण पद्धती नसल्याने आजच्या स्पर्धेच्या युगात इथला विद्यार्थी मागे पडत आहे त्यासाठी संपूर्ण व्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा ,वेदनांचा अभ्यास करून त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे दिवस येतील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे असे मत प्रा.इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केले .आपल्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा कवितांच्या सादरीकरणातून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना महात्मा फुले स्मृती कार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष वैरागकर यांनी केले तर आभार जयंत उपासे यांनी मांडले सूत्रसंचालन श्री प्रवीण स्वामी व श्रीम संगीता डोकडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री दयानंद पाटील ,वनराज सूर्यवंशी ,श्रीशैल बिराजदार, संजय वैरागकर, शुभम वैरागकर, सतीश वैरागकर, रघुवीर आरणे ,मुत्तणा बबलेश्वर ,दत्तात्रय लांडगे ,अमर परळकर ,शिवानंद माशाळकर , श्रीम.सरिता उपासे.आदींनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
महात्मा ज्योतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार
श्री.प्रदीप रोटे, श्री.श्रीराम माळी, श्री.रमेश सावंत, श्रीम.ज्योती सुकाळे , श्री.श्रीशैल्य जट्टे, श्रीम.निर्मला यादव ,ईश्वर नांगरेमहात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार- सुधीर कोरे
महात्मा फुले स्मृती अधिकारी पुरस्कार. -श्री दत्तप्रसाद जंगम
महात्मा जोतिबा फुले स्मृती सरपंच पुरस्कार -श्रीमती सुनिता देविदास पावशेरे
महात्मा ज्योतिबा फुले स्मृती उद्योजक पुरस्कार – श्री नितीन होळे
महात्मा ज्योतिबा फुले स्मृती साहित्य पुरस्कार श्री देविदास सौदागर
महात्मा ज्योतिबा फुले स्मृती जीवन गौरव पुरस्कार -श्री विश्वनाथ महाजन