लोहारा शहरात पोलीसाचा रूट मार्च

लोहारा ( जि. धाराशिव ) : आज शनिवारी लोहारा शहरातील डॉ.आंबेडकर चौक ते लक्ष्मी भांडी स्टोअर्स दुकान ते आझाद चौक,जगदंबा मंदिर ते रजिस्ट्री ऑफिस ते बस स्थानक ते छत्रपती शिवाजी चौक असा येणाऱ्या काळातील सण उत्सव तसेच कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने रूट मार्च घेण्यात आला असून सदर रूट मार्च करिता एक मोबाईल वाहन पोलीस निरीक्षक अजित चिंतले, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.के. नरवडे,पोलीस उपनिरीक्षक आर.आर. पवार,पोलीस विठ्ठल ढवण,कांतू ऱाठोड, निरजन फुलमाळी, किशोर शेवाळे, विजय कोळी,अर्जुन तिघाडे,नागेश रजपुत,बालाजी जाधव,सुनिल मोरे, सदाशिव पांचाळ, सुनिल जाधव विनायक तांबे, बालाजी तिघागे आदी सहभागी झाले होते.