पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना चार दिवसात अग्रीम रकमेचे वाटप करणार

धाराशिव : पाच हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चार दिवसात अग्रीम रकमेचे वाटप करणार असल्याची माहिती जिल्हास्तरीय समितीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

खरीप 2023 च्या संदर्भात काल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक संपन्न झाली. धाराशिव जिल्ह्यातील पाच लाख सात हजार 468 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी पाच लाख 29 हजार 2 16 शेतकऱ्यांना पिक विमा रकमेचे वितरण झाल्याचे सांगण्यात आले.

अद्यापही 31 हजार 136 शेतकरी 25% अग्रीम रकमेपासून वंचित आहेत त्यात सीएससी रिव्हर्ट शेतकऱ्यांची संख्या 7975 इतकी असून बँक तपशील पडताळणी न झालेली शेतकरी संख्या 5368 इतकी आहे कागदपत्र पडताळणीसाठी प्रलंबित कंपनीत स्तरावर 6980 शेतकरी संख्या असून पाच हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असलेले पडताळणीसाठी प्रलंबित 5160 शेतकरी आहेत अपात्र करण्यात आलेले अर्ज 5653 इतके असल्याची माहिती देण्यात आली.
जिल्हाधिकाऱ्यांची संयमी मात्र शेवटच्या शेतकऱ्यांना आगरीम रक्कम मिळेल याबाबतची तळमळ काल जिल्हास्तरीय बैठकीत दिसून आली. काल घटक निहाय आढावा घेण्यात आला तसेच त्यातील उनिवा दूर करून प्रत्येक शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळेल अशी व्यवस्था करण्याचे आदेश विमा कंपनीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिले तसेच तालुका निहाय यासंदर्भात कॅम्प लावून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून त्या आठवडाभरात दूर कराव्यात असेही आदेशित केले गेले.
बोगस क्षेत्र दाखवून महाराष्ट्र शासनाच्या जमिनीवर देखील काही जणांनी विमा भरण्याची प्रकरणे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निदर्शनास आणून दिले त्यावर दोन दिवसात त्याबाबत तातडीने अहवाल देऊन गुन्हा नोंद करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीतच स्पष्ट केले त्यामुळे बोगस विमा भरणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

पुन्हा एकदा 26 डिसेंबरला बैठक

चालू आठवड्यात किती शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम दिली तसेच घटकनिहाय सविस्तर माहिती घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्याला अग्रीम देऊन पुन्हा 26 डिसेंबर मंगळवारी आणखी आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे .दरवर्षी जिल्हा तक्रार निवारण समितीची एखादी बैठक होते मात्र यानंतरची होणारी तिसरी बैठक असून प्रत्येक शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम मिळाली पाहिजे याबाबत स्वतः जिल्हाधिकारी लक्ष घालत आहे.
या जिल्हास्तरीय आढावा बैठकीसाठी स्वतः डॉक्टर सचिन ओंबासे जिल्हा कृषी अधीक्षक श्री रविंद्र माने सर शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप जिल्हा कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद धाराशिव ,कृषी उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय धाराशिव ,अग्रणी बँकेचे अधिकारी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!