पंतप्रधान विश्व कर्मा योजना रथ यात्रेचे तालुका भाजपाच्या वतीने जंगी स्वागत

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान विश्व कर्मा योजना रथ यात्रेचे लोहारा तालुका भाजपाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले.
पंतप्रधान विश्व कर्मा योजना रथ यात्रेचे माध्यमातून पारंपरिक कारागिरांच्या मदतीसाठी केंद्रीय योजनांची माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष शिवशंकर हत्तरगे, जिल्हा कोषाध्यक्ष नेताजी शिंदे, मा. जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटी, मा.भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, कमलाकर सिरसाठ, संपत देवकर, दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, बाबा सुंबेकर, मिलिंद सोनकांबळे, विजय महानूर, मल्लिनाथ फावडे, कल्याण ढगे, सिद्रामप्पा नरुणे, उमाकांत स्वामी, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.