क्रीडा संकुलनासाठी स्वराज्य पक्षाच्या तिघांचे तहसिलसमोर आमरण उपोषण

लोहारा / प्रतिनिधी

लोहारा येथे प्रस्तावित असलेले क्रीडा संकुल लोहारा शहर परिसरातच व्हावे यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने दिनांक 20 12 2023 पासून आमरण उपोषणास तहसील कार्यालय लोहारा येथे सुरुवात केली असून दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की लोहारा तालुक्यातील मंजूर असलेले क्रीडा संकुल लोहारा शहरातच नगरपंचायत च्या हद्दीमध्ये आरक्षित असलेल्या जागेत किंवा नव्याने आरक्षित जागा आरक्षित करून किंवा शहराच्या आजूबाजूच्या ग्रामीण भागात गायरान जमिनी मध्ये क्रीडा संकुल करण्यात यावे यासाठी स्वराज्य पक्ष सातत्याने पाठपुरावा करत असून यापूर्वी देखील स्वराज्य पक्षातर्फे लोहरा शहरातील शिवाजी महाराज चौकात रस्ता रोको घेण्यात आला होता तरीदेखील प्रशासनाला जाग आली नसल्यामुळे स्वराज्य पक्षा च्या माध्यमातून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे या आमरण उपोषणास युवक काँग्रेस,आधुनिक लहुजी सेना वसंतराव काळे माध्यमिक विद्यालय, युवा हिंदू साम्राज्य सेना, प्रहार जनशक्ती पक्ष, आदींनी जाहीर पाठिंबा दिला असून क्रीडा संकुलासाठी लोहारा बंदची हाक देखील स्वराज्य पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी स्वराज्य पक्षाचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे तालुका अध्यक्ष प्रशांत थोरात उपाध्यक्ष तानाजी पाटील, यावेळी संध्याकाळी चार वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाचा व तहसील प्रशासनाच्या एकही अधिकारी उपोषण स्थळी फिरकला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे,.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!