लोककल्याणच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना दिपावली फराळ वाटप

लोहारा (जि.धाराशिव ) : उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने मंगळवार (दि.७) रोजी सास्तुर ता.लोहारा येथील निवासी दिव्यांग अनाथ शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी फराळ,आकाश कंदीलसह इतर साहित्याचे वाटप करण्यात आले.
दिव्यांग व अनाथ विद्यार्थी दिपावली सणाच्या आनंदापासून वंचित राहू नयेत हा यामागील उद्देश असल्याचे संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांनी सांगितले.
दिव्यांग अनाथ मुलांना नवचैतन्य व त्यांच्या जिवनातील अंधकार दूर होऊन त्यांचे जिवन प्रकाशमय होऊन इतरांप्रमाणे त्यांनीही दिवाळी सण साजरा करुन आनंद घ्यावा यासाठी लोककल्याण संस्थेच्या वतीने गेली ५ वर्षे झाली या निवासी दिव्यांग अनाथ शाळेतील १०० विद्यार्थ्यांना दिपावली फराळ तसेच इतर साहित्याचे वाटप करुन हा उपक्रम राबविला जातो.


या दिवाळी फराळ व साहित्य वाटप उपक्रमासाठी संस्थेचे सचिव रवि दासमे,वि.का.सोसायटीचे संचालक दत्तात्रय सुरवसे,संस्था अध्यक्ष विक्रम दासमे,दिव्यांग संघटनेचे ज्ञानेश्वर राठोडे,जयश दासमे,बालाजी हालगरे,शिवकंठ पाटील,संघर्ष कांबळे,शाळेचे मुख्याध्यापक डी.पी.नादरगे,शिक्षिका अंजली चालवाड,संध्या गुंजारे,लक्ष्मी घोडके,संजय शिंदे,राम बेंबडे,विठ्ठल शेळगे,प्रविण वाघमोडे,राजकुमार गुंडूरे,गोरक पालमपल्ले,सुर्यकांत कोरे,निवृत्ती सुर्यवंशी,निशांत सावंत,शंकरबाबा गिरी,संभाजी गोपे आदी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!