लोहारा शहरातील युनियन बॅकेचा १०५ वा वर्धापन दिन साजरा

 

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा (जि.धाराशिव ) : लोहारा शहरातील युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेला १०५ वर्षे पुर्ण होऊन यशस्वी वाटचाल सुरु झाल्याबद्दल लोहारा शाखेत बँकेचे शाखा व्यवस्थापक संदीप विजयकुमार पुरी व बँकेच्या ग्राहकांच्या यांच्या हस्ते शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी केक कापून, मिठाई वाटून मोठ्या उत्साहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.


यावेळी शाखा व्यवस्थापक संदीप पुरी, सहाय्यक शाखा व्यवस्थापक ऋषिकेश जोशी, विशेष सहाय्यक विकास जाधव, क्लार्क विशाल बिरादार, रोखपाल दामोदर सुर्यवंशी, बसय्या स्वामी, श्री. माणिकशेट्टी, एम. डी.लोहार,पत्रकार बालाजी बिराजदार, अनुज बिराजदार, डॉ. जितेंद्र मेटे, सचिन फताटे, युनियन बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक अशोक दुबे, यांच्यासह बँकेचे खातेदार, ठेवीदार, हितचिंतक, शेतकरी, व्यापारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!