लोहारा तहसील कार्यालयासमोर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांचे बेमुदत उपोषण सुरु

लोहारा : धाराशिव, तुळजापूर,उमरगा, कळंब या आगाराच्या अनेक बसेस गेल्या वर्षभरापासून बंद आहेत. ते चालू करण्यासंदर्भात बरेच निवेदन दिले. परंतु कोणताही निर्णय न झाल्याने व मे २०२१ चे स्वस्त धान्य दुकानदारांनी धान्याचे चलन भरले पण माल मिळाला नाही. त्यामुळे पैसे परत द्या या मागणीसाठी लोहारा तहसील कार्यालयासमोर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कदम हे सोमवारी ६ नोव्हेंबर पासुन बेमुदत उपोषणास बसले आहेत.