जेवळी येथे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन व प्रतिमेचे दहन

जेवळी, (ता.लोहारा )

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाचा निषेधार्थ जेवळी येथे बुधवारी (ता.१८) लिंगायत समाज बांधवांनी जितेंद्र आव्हाड त्यांच्या प्रतिमेला जोडे मारुन व प्रतिमेचे दहन करीत आंदोलन केले.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्याबद्दल एका पत्रकार परिषदेत वादग्रस्त विधाना केल्याने लिंगायत समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बुधवारी (ता.१८) जेवळी (ता.लोहारा) येथे जितेंद्र आव्हाड यांच्या वादग्रस्त विधानाचा निषेधार्थ लिंगायत समाज बांधव येथील स्मृती चौकात एकत्र येत येथे जाहीर निषेध केला. यावेळी महात्मा बसवेश्वरांचे अभ्यासक शिक्षक रामकृष्ण पाटील यांनी बसवेश्वराचे चरित्राची ओळख करून दिली. यानंतर समाज बांधवांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारुन व प्रतिमेचे दहन करून निषेध केला.

यावेळी नागेश पणुरे, वैजिनाथ सोळशे, अमर पणुरे, श्रीशैल बिराजदार, अशोक भुसणे, पंडित पाटील, सुभाष हावळे, जगन्नाथ ढोबळे, धनराज बिराजदार, शंकर हावळे, भिमा मिलगिरे कल्लाप्पा हावळे, सुरेश दंडगुले, संतोष हावळे, बाळाप्पा चौधरी, बुद्धिवंत साखरे, मल्लिनाथ कारभारी, रोहित कारभारी, नितीन लिबाळे, प्रथमेश पाटील , बसवराज हावळे, मंगेश होनाजे, सुनील चवले , अमोल बिराजदार, राजशेखर वलदोडे, सूर्यकांत पनुरे, फुलचंद कारभारी, जगन्नाथ हावळे, सुभाष सारणे , नागेश होणजे , प्रकाश ढोबळे, नागेश वलदोडे आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!