लोहारा तालुका भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन

लोहारा / प्रतिनिधी
कंत्राटी भरतीवरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे काम उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने केले होते. म्हणून कंत्राटी भरतीचे महापाप करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार, राहुल गांधी यांनी माफी मागावी यासाठी, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य पाटील, उमरगा, लोहारा विधानसभा अध्यक्ष राहुल पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोहारा तालुका भाजपाच्या वतीने लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि‌‌.21 ऑक्टोंबर 2023 रोजी आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करुन निषेध करण्यात आला. या आंदोलनात भाजपा तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शुभम साठे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, संपत देवकर, व्यापारी आघाडी तालुकाध्यक्ष मल्लिनाथ फावडे, बाबा सुंबेकर, प्रतिक गिरी, काशीनाथ घोडके, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!