कॉग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

लोहारा ( जि.धाराशिव ) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण,युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजीत चव्हाण, प्रदेश काँग्रेस कमिटी सचिव सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे उपस्थित होते.