लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे धरणे आंदोलन 

लोहारा (जि.धाराशिव ) : गेली अनेक वर्षांपासून मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. त्यासाठी लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन करीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनानंतर आता बुधवारपासून (ता. १८) असहकार आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

यावेळी ग्रामसेवक संवर्गाचा कालब्ध पदोन्नती आदेश काढण्यात यावे, सहाव्या वेतन आयोगाचे फरक व व्याज रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यावर जमा करावे, कंत्राटी ग्रामसेवकांची अनामत सुरक्षा ठेव परत मिळावी, एखाद्या ग्रामसेवक विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळल्याशिवाय कोणतीच कारवाई करण्यात येऊ नये, जणगणना २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे ग्रामविकास अधिकारी सज्जाची पुर्नरचना करण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांना दिले.

HTML img Tag Simply Easy Learning

या धरणे आंदोलनात ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष एम.टी. जगताप, तालुकाध्यक्षक गोविंद पाटील, दत्तात्रय पाटील,डी.पी.पवार, तानाजी जाधव, संजय कारभारी, एन.ए.दबडे, अशीष गोरे, सहदेव मातोळे, टी.एन. घंटे,एम.के. बनशेट्टी, देविदास कुर्ले, गोविंद कोकाटे, रामदास बोयणे, गंगाधर इंगळे, मेघराज कदम, राम अलमले,कलय्या स्वामी, टी. व्ही.जाधव, कडदोरे, गाडेकर,पोतदार यांच्यासह सर्व ग्रामसेवक सहभागी झाले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!