लोहारा शहरात कलश व रथयात्रेचे उत्साहात स्वागत

लोहारा (जि.धाराशिव) : या वर्षी छञपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असल्याने 350 वा हिंदू साम्राज्य स्थापना दिन साजरा करण्यात येणार असल्याने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल धाराशिव यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरात कलश व रथ यात्रा काढण्यात आलेली आहे, या रथयात्रेचे उद्घाटन दिनांक 01आक्टोबर 2023 रोजी उमरगा तालुक्यातील अचलबेट देवस्थान या ठिकाणाहून या कलश व रथयात्रेचे सुरूवात करण्यात आली. लोहारा येथील भारतमाता मंदिर याठिकाणी हि रथयात्रेचे स्वागत व कलशाचे पूजन मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व कलशाचे पूजन करण्यात आले यानंतर रथयात्रेचे उद्देश सांगताना चंदनशिवे म्हणाले की, छ.शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्यास 350 वर्ष पूर्ण होत असून , 16 व्या शतकातील राज्याभिषेक झालेले एकमेव हिंदु राजे होते, हे सर्व हिंदुसाठी गौरवास्पद इतिहास आहे, हा इतिहास पुढच्या पिढीला माहित होण्यासाठी या रथयातत्रेचे अयोजन करण्यात आलेले आहे.

याप्रसंगी धाराशिव जिल्हा धर्मप्रसार प्रमुख श्री मुरलीधर कुलकर्णी, बबनगिरी महाराज उंडरगावकर, दत्तमामा सलगरे, दिनकर जावळे पाटील, शंकर जाधव, शहाजी जाधव, यशवंत चंदनशिवे, विक्रांत संगशेट्टी, दगडू तिगाडे, प्रमोद पोतदार, कल्याण ढगे, बालाजी चव्हाण, अशोक तिगाडे, यशवंत चंदनशिवे, मनोज तिगाडे, विरेष स्वामी, युवराज जाधव, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!