नगपंचायतमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील नगरपंचायत कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापती सौ.आरती ओम कोरे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम घेऊन जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वच्छता कामगारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. व लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी लहान मुलींनी आकर्षक सुंदर अशी रांगोळी काढली होती. यावेळी उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती सभापती आरती ओम कोरे, नगरसेवक अविनाश माळी, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, ओम कोरे, पं. स.माजी सदस्य दिपक रोडगे, नवनाथ लोहार, श्रीशैल्य मिटकरी, मल्लिनाथ बिराजदार, पप्पू भरारे, कमलाकर मुळे, गणेश काडगावे, मतीन शेख, गुरुनाथ रसाळ, उमाकांत सगट, बाळु सातपुते, स्वच्छता विभागाचे कर्मचारी व स्वच्छता कामगार उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!