आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना फळे व खाऊ वाटप; मान्यवरांच्या उपस्थितीत झाला आनंदसोहळा
लोहारा/प्रतिनिधी
धर्म, समाज आणि मानवता यांचा सुंदर संगम लोहारा शहरात पाहायला मिळाला. इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंती (ईद-ए-मिलादुन्नबी) व हिंदूंच्या गणेश उत्सवाचे औचित्य साधून मिलाप मित्र मंडळातर्फे मार्डी येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ५ सप्टेंबर रोजी फळे व खाऊ वाटप करण्यात आले.
HTML img Tag

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर होते. प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत काळे (आपला दवाखाना, लोहारा), शिवसेना जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष नरदेव कदम, माजी नगरसेवक आयुब अब्दुल शेख टेलर, भाजपा तालुका सरचिटणीस व पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, मिलाप मित्र मंडळ संस्थापक अध्यक्ष दादाभाई मुल्ला, काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष इस्माईल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख, पोलीस पाटील संघटना तालुकाध्यक्ष तानाजी माटे, सेवानिवृत्त अधीक्षक किरण पाटील, जगदंबा मंदिर ट्रस्ट उपाध्यक्ष प्रविण कांबळे, उद्योजक जिंदावली शेख, पत्रकार आब्बास शेख व महेबूब फकिर, मुख्याध्यापक बी.बी. भोसले, शिवा थोरात, शाहरुख गवंडी, सोमवंशी सर, शरद मुळे सर आदींची लाभली.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. यावेळी जिल्हा उपप्रमुख शब्बीर गवंडी यांनी इस्लाम धर्मातील मानवतेचा संदेश आणि गणेशोत्सवाच्या एकतेच्या परंपरेवर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक बी.बी. भोसले यांनी मानले.
फळांचा गोडवा, खाऊची मजा आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे आश्रम शाळेतील लहानग्यांचा आनंद दुपटीने वाढला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्यच या उपक्रमाचे खरे यश ठरले.
Back to top button
error: Content is protected !!