उर्वरित पन्नास टक्के अर्थात 294 कोटी रुपये रक्कम देण्यास विमा कंपनी तयार – याचिकाकर्ते अनिल जगताप

धाराशिव : खरीप 2022 मधील उर्वरित पन्नास टक्के अर्थात 294 कोटी रुपये रक्कम देण्यास भारतीय कृषी विमा कंपनी तयार जिल्हाधिकाऱ्यांना दिले लेखी पत्र याचिकाकर्ते अनिल जगताप यांनी माहिती दिली आहे.
गेल्या वर्षी केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून भारतीय कृषी विमा कंपनीने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ पन्नास टक्केच रक्कम दिली होती ती 294 कोटी रुपये होती याविरुद्ध शेतकरी अनिल जगताप यांनी सुरुवातीला जिल्हा व विभाग स्तरीय समितीकडं तक्रार दाखल केली समितीने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला 50 टक्के उर्वरित रक्कम पंचनामाच्या प्रति व एक लाख 45 हजार सूचनाचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले मात्र पीक विमा कंपनी त्याला जुमानत नव्हती.
त्यामुळे शेतकरी अनिल जगताप यांनी शेवटी राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सुरुवातीला 10 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला व त्यानंतर 24 ऑगस्ट 2023 रोजी राज्य तक्रार निवारण समितीची बैठक होऊन शेतकऱ्याच्या बाजूने व अनिल जगताप यांच्या बाजूने निकाल देऊन कंपनीला 50 टक्के रक्कम पंचनामेच्या प्रती व एक लाख 45 हजार सूचनाचे फेर सर्वेक्षणाचे आदेश झाले मात्र कंपनी त्यालाही जुमानत नव्हती शेवटी अनिल जगताप यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे महसुली वसुलीचा आग्रह धरला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुली सुरू केली सुरुवातीला 29 नोव्हेंबर ,11 डिसेंबर, 21 डिसेंबर 2023 रोजी तीन नोटीसा दिल्या व नंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात केली कंपनीचे खाते 30 करून प्रॉपर्टी अटॅच केली गेली त्यामुळे कंपनीत वटणीवर आली. काल भारतीय कृषी विमा कंपनीच्या दिल्ली येथील दोन अधिकाऱ्यांनी तसेच विभागीय व्यवस्थापक श्री सावंत यांनी काल जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन 25 जानेवारी पर्यंत 294 कोटी रुपये देत असल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी यांना दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी कंपनीचे खाते पूर्ववत करण्याचे आदेश दिले.
मी दाखल केलेल्या याचिकेवरून राज्य तक्रार निवारण समितीने आदेश दिला होता जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुली करून कंपनीला टाळ्यावर आणले कंपनीने 25 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांना रक्कम देण्याचे मान्य केले आहे याचा मला मनातून आनंद झाला तर शिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काही करता आले याचा मनातून आनंद होत आहे
अनिल जगताप याचिकाकर्ते खरीप 2022