खरीप 2022 राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या 30 ऑगस्टच्या निर्णयाच्या संरक्षणासाठी खंडपीठात कॅव्हेट दाखल – अनिल जगताप

लोहारा : खरीप 2022 राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या 30 ऑगस्टच्या निर्णयाच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात कॅव्हेट दाखल केले असून त्याचा क्रमांक 23 71 आहे अशी माहिती याचिका करते अनिल जगताप यांनी दिली आहे.
खरीप 2022 मध्ये भारतीय कृषी विमा कंपनीने केंद्रीय परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अर्धीच रक्कम वाटप केली होती याविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कंपनीला अनेकदा सांगून देखील काही उपयोग झाला नव्हता त्यामुळे सुरुवातीला जिल्हास्तरीय व विभाग स्तरीय समितीकडे तक्रारी दाखल झाल्या दोन्ही बाजूंनी शेतकऱ्यासारखा निकाल दिला गेला मात्र कंपनी तो आदेश मानत नव्हती म्हणून याचिका करते शेतकरी अनिल जगताप यांनी राज्यस्तरीय समितीकडे तक्रार दाखल केली होती यासंदर्भात राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक 24 ऑगस्ट रोजी मंत्रालय मुंबई येथे झाली व 30 ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला गेला त्यात कंपनीला नुकसानीच्या टक्केवारीच्या प्रमाणात नुकसान भरपाई पंचनामेचे प्रती एक महिन्यात उपलब्ध करून देणे बात केलेल्या पूर्वसचिनांचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या आदेशाच्या संरक्षणार्थ याचिका करते आणि जगताप यांनी तातडीने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात कॅव्हेट दाखल केले आहेत
यापूर्वीच 18 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीने दिलेल्या निर्णयाच्या संरक्षणासाठी श्री जगताप यांनी उच्च न्यायालयात कॅफेट क्रमांक 23 झिरो नऊ दाखल केले होते तसेच कालच राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीचा निकाल आल्यानंतर त्या निकालाच्या आदेशाच्या संरक्षणार्थ आज पुन्हा उच्च न्यायालयात 23 71 या क्रमांकाने कॅव्हेट दाखल केले आहे त्यामुळे पिक विमा कंपनी उच्च न्यायालयात गेली तरी एकतर्फी स्थगिती मिळणार नाही जेणेकरून प्रशासनाला कंपनीकडून रक्कम वसूल करून घेण्यास मदत होणार आहे.
यापूर्वीच राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीच्या आदेशाच्या संरक्षणात कॅव्हेट दाखल केली होती आज पुन्हा राज्यस्तरीय तांत्रिक निवारण समितीच्या आदेशाच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात कॅव्हेट दाखल केले असून कुठलीही रिस्क न घेता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.