कांबळे गुरुजीनी 34 वर्ष शिक्षण सेवेत कार्यरत राहून अध्यापनाचे कार्य केले – शरण पाटील

उमरगा : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील व आ.विक्रम काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आज लालबहादूर शास्ञी विद्यालय मौजे बेळंब शाळेतील श्री दत्ताञय कुशाबा कांबळे यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम सोहळा संपन्न झाला.
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण बसवराज पाटील म्हणाले की, “34 वर्ष शिक्षण सेवेत कार्यरत राहून अध्यापनाचे विद्यार्थ्यांना धडे गिरवण्याचे अविरतपणे कार्य केले संस्थेचे पहिले शिक्षक होत कष्ट प्रमाणिकपणा शिक्षणसेवेत सातत्य या गोष्टी शाळेची प्रगती यामध्ये चांगल्या कार्याचा ठसा कर्तबगारीने उमटिवला..”
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव महालिंग बाबशेट्टी,राजू मुल्ला उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,नगरसेवक महेश माशाळकर, गणेश माने,श्रीमंत घंटे,राजेंद्र जमादार, श्रीमंत भुरे,बेळंब मा.सरपंच महानंद कलशेट्टी,रविंद्र कारभारी,श्री आसबे सर,अंकुश नाडे,विठ्ठल कांबळे, यांच्यासह ग्रामस्थ शिक्षकवृंद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.