पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम देण्यासाठी लोहारा व उमरगा तालुक्यातील याही महसूल मंडळाचा झाला समावेश

धाराशिव : पीक विम्याची 25% अग्रीम रक्कम देण्यासाठी आज लोहारा, माकणी व नारंगवाडी या तीन महसूल मंडळाचा नव्याने समावेश करण्यात आला असून आता आगरीम रक्कम देणाऱ्या महसूल मंडळाची संख्या 36 इतकी झाली आहे.
26 जून 2023 च्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या पिक विमा शासन निर्णयानुसार अपेक्षित उत्पादनात 50 टक्के घट होत असेल तर शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम रक्कम दिली जाते. यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती असून पावसाने ओढ निर्माण दिल्याने विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. जर सतत 21 दिवस पावसाचा खंड पडला तर त्या महसूल मंडळात अपेक्षित उत्पादनातील 50 टक्के घट ग्राह्य धरली जाते. अडीच मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास पुन्हा नव्याने 21 दिवसाची मोजणी होते.
यावर्षी धाराशिव जिल्ह्यातील सात लाख 57 हजार 757 अर्जदार शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता व त्या पोटी 612 कोटी रुपये पिक विमा कंपनीला शेतकरी केंद्र व राज्य शासनाकडून देय रक्कम आहे.
यापूर्वीच धाराशिव जिल्ह्यातील तेहतीस महसूल मंडळामध्ये 25% अग्रीम रक्कम देण्याबाबत सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले होते त्यात आता तीन नवीन महसूल मंडळाची भर पडली असून लोहारा तालुक्यातील लोहारा जेवळी मागणी व धानोरी चारही महसूल मंडळे अग्रीम रकमेसाठी पात्र ठरल्याने लोहारा तालुका हा एकमेव पहिला तालुका आहे ज्या तालुक्यातील सर्वच गावे आगरीम रकमेसाठी पात्र ठरली आहेत.
नियमानुसार महसूल मंडळात दहा ठिकाणी सर्वेक्षण केले जाते व त्यानुसार त्या मंडळाची नुकसान भरपाई ची टक्केवारी दिले जाते येणाऱ्या टक्केवारीच्या प्रमाणात २५% अग्रीम रक्कम त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना दिली जाते एकदा अधिसूचना निघाल्यानंतर तीन आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देणे पिक विमा कंपनीवर नियमानुसार बंधनकारक आहे.
यावर्षी भयानक दुष्काळी परिस्थिती असून पावसाने चांगलीच ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून त्याला आर्थिक मदतीची अत्यंत आवश्यकता आहे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करून शेतकऱ्यांना 25% अग्रीम रक्कम देण्याबाबत अधिसूचना काढून शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम वर्ग होईपर्यंत नेहमीच पाठपुरावा राहील. 25% अग्रीम रक्कम देण्यासाठी माझ्या लोहारा तालुक्यातील सर्वच गावे पात्र ठरले आहे त्यामुळे तातडीने या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात येईल.
अनिल जगताप माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस धाराशिव