शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या भिकमागो आंदोलन

लोहारा : लोहारा शहरामध्ये विकासकामे चालु आहेत.काही ठिकाणच्या कामाच्या अंदाजपत्रकामध्ये बंदिस्थ नाली आहे. ते काम अंदाजपत्रकानुसार करणे गरजेचे असताना कामे अंदाजपत्रकानुसार न करता नालीवर छत टाकत असताना तेथे राहण्यार्या नागरीकांकडुन लादी घेऊन तेथे छत टाकण्यात आले.तसेच ज्या नागरीकांनी छत टाकण्यासाठी लादी दिली नाहि अश्या नागरीकांच्या घरासमोरील नालीवर छत टाकण्यात आले नाही.अजुनही काही ठिकाणी हे छत टाकण्यात आले नाही.यामुळे त्या संस्थेच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज चौक ते त्या नालीच्या ठिकाणापर्यत भिकमागो आंदोनल करण्यात आले.
लोहारा शहरातील नागरीकांकडुन,बाजारपेठेतुन या आंदोलणाच्या माध्यमातुन ७०७रु रक्कम गोळा करण्यात आली.ही रक्कम बालाजी कंट्रक्शनच्या पोष्टाच्या माध्यमातुन पाठवण्यात येणार आहे.
यावेळी बोलत असताना शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांनी तेथे नालीवर हे छत टाकण्यात आले नाही तेथे तात्काळ छत टाकण्यात यावा व जेथे नागरीकांकडुन लादी घेऊन छत टाकण्यात आला तेथील नागरीकांकडुन जे पैसे घेतले आहेत ते पैसे या संस्थेने तात्काळ परत करावे अन्यथा यापेक्षाही तिव्र आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातुन करण्यात येईल.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख,नगरसेवक प्रशांत काळे,माजी नगरसेवक शाम नारायणकर,माजी ग्रा.प.सदस्य महेबुब गवंडी,युवक कॉग्रेसचे शहरप्रमुख हरी लोखंडे,माजी ग्रा.प.सदस्य दत्ता स्वामी,माजी वि.का.से.सो.सदस्य रघुविर घोडके,युवासेना शहरप्रमुख दिनेश गरड,सोशल मिडीया तालुका प्रमुख प्रेम लांडगे,लोहारा शहरातील शाखाप्रमुख गोविंद बंगले,महेश बिराजदार,बालाजी माशाळकर,आमिर शेख,अजित घोडके,हामजा खुट्टेपड,बळीराम गोरे, अक्षय सगट,शिवा सुतार,मोहन वचने,तुकाराम वाळके, परमेश्वर चिकटे,बबलु मोमीन,शिवन काडगावे यासह शिवसेना पदाधिकारी,शिवसैनिक,युवासैनिक यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.