धनादेश अनादर प्रकरणातुन आरोपीची निर्दोष मुक्तता

लोहारा : मौजे पेठ सांगवी ता. उमरगा येथिल दत्तू घोडके यांची मुलगी विश्रांती हिचे लग्न मौजे खेड ता. लोहारा येथिल उध्दव बनसोडे यांचेशी झाले होते परंतू त्यांचा संसार सुरळीत चालू नव्हता म्हणुन त्यांनी संमतीने घटस्पोट घेण्याचे ठरवुन उमरगा न्यायालयत अर्ज दाखल केला होता व त्या करीता सदर उध्दव यांनी त्याचे पत्नीस तीन लाख रू देण्याचे ठरले होते परंतू सदर उध्दव व त्याची पत्नी विश्रांती हे कोर्टात हजर झाले नाहीत म्हणुन ते प्रककरण डिसमिस झाले होते परंतू सदर उध्दव यांनी त्याचे पत्नीस मौजे खेड येथिल ब्रम्हानंद पाटील यांचे खातेचे धनादेश दिले होते व सदर धनादेशाचे अनादर झाले म्हणुन फिर्यादी दत्तु घेडके यांनी उमरगा येथिल न्यायालयात प्रकरन दाखल केले होते.

HTML img Tag Simply Easy Learning

सदर प्रकरणात फिर्यादी तर्फे स्वतः फिर्यादी दत्तु घोडके त्याची मुलगी विश्रांती व बँक मॅनेजर यांची साक्ष घेण्यात आली होती तर आरोपी तर्फे कोनताही साक्षीदार तपासण्यात आला नाही. सदर प्रकरनात आरोपी व फिर्यादी यांचे दरम्यान कोनताही कायदेशिर व्यवहार झाला नसुन सदर आरोपी फिर्यादीचे कोनतही देणे लागत नाही व मध्यस्त यांचेवर कोनतीही देणे देण्याची जबाबदारी येत नाही ही बाब आरोपीचे वकील यांनी त्याचे युक्तीवादा दरम्यान न्यायलयाच्या निदर्शनास आनुन दिले सदरचा युक्तीवाद ग्राहय धरून उमरगा येथिल न्यायमुर्ती केतनकुमार तेलगावकर यांनी आरोपी ब्रम्हानंद पाटील रा. खेड यांची निर्दोष मुक्तता केली आरोपीचे वतीने अॅड. एस. एन. बादुले लोहारा यांनी काम पाहीले तर अॅड कु. व्ही व्ही गुंड लोहारा यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!