शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देणे हेच लोकप्रतिनिधींचे कर्तव्य – आमदार चौगुले

उस्मानाबाद : उमरगा लोहारा मतदारसंघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांच्या नुकसानी पोटी शासनाकडून भरघोस अनुदान प्राप्त होणे 2020 च्या खरीप हंगामातील पिक विमा मिळण्यासाठी न्यायालयीन लढत यश मिळवणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50000 प्रोत्साहन पर अनुदान वाटप होणे तसेच किल्लारी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मंजूर करून घेणे याबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडून यशस्वी पाठपुरावा झाल्याबद्दल मुरूम मंडळातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार ज्ञानराज चौगुले यांचा श्री महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्था मुरूम येथे सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना आमदार चौगुले यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे हेच आम्हा लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी मी शासन स्तरावर व प्रसंगी न्यायालयीन लढाई लढत राहणार असे अभिवचन यावेळी दिले.


बेनितुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे अतिरिक्त पाणी अडवण्यासाठी यापूर्वी मी बेनितुरा पात्रात जवळपास आठ सिमेंट बंधारे पूर्ण केले असून पुढील काळातही मोठे बॅरेज प्रस्तावित केले आहेत. तसेच याचबरोबर मराठवाड्याचे न्याय हक्काचे 21 टीएमसी पाणी आपल्या मतदारसंघातील शेवटच्या टोकापर्यंत आणणे, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वेळेवर वीज पुरवठा उपलब्ध करून देणे, मातोश्री पाणंद रस्त्याच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतरस्ते करणे, आदि कामांना पुढील काळात प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार ज्ञानराजजी चौगुले साहेबांनी यावेळी दिली.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष शिवशरण वरानाळे, भीमराव अण्णा वरनाळे, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, उमरगा तालुका प्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुका प्रमुख जगन पाटील, शरण मुदकना, प्रकाश इंगोले सर मराठवाडा मित्र मंडळ, नागेश पाटील,आप्पासाहेब पाटील, काकासाहेब चव्हाण, विलास भगत, बाबासाहेब पाटील, अमोल पटवारी, दिलीप येडगे, खय्युम चाकुरे, सुरेश दंडगुले, धोंडीराम पवार, मनिष मुदकण्णा ,श्रीधर ईंगळे ,रजनीकांत वाघ ,युवासेना मुरुम शहर प्रमुख भगत माळी, मोहन जाधव ,गिरी पाटील, हणमंत टेकाळे, मल्लप्पा भोसले, संतोष जाधव, शाम सुरवसे, कल्लेश्वर पाटील, रत्नाकर जाधव, सागर उमाशेट्टी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!