विजेचा धक्का लागून वानर जखमी

किल्लारी : तपसे चिंचोली येथील गावालगत असलेल्या मोबाईल टॉवरच्या बाजूच्या विद्युत खांबावर 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वानर उड्या मारण्याच्या गडबडीत विद्युत खांबाला धरले असता अचानक झटका बसून जखमी झाले.यावेळी त्याच्या अंगावरील केस विद्युत प्रवाहाने जळून गेले. यावेळी सर्वप्रथम गावातील बंडेश्वर मुळे व महेश गरड ,रामेश्वर वडगावे यांनी वनविभागाला कळवले. यावेळी वनकर्मचारी राहुल शिंदे, रमेश जावळे , हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी वानराला पकडून घेऊन खाजगी वाहनांच्या मदतीने लामजना येथील पशुवैद्यकीय केंद्रात नेऊन पशुवैद्यकीय आरोग्य कर्मचारी बजरंग कांबळे ,प्रमोद नेटके यांच्या उपस्थितीत प्राथमिक उपचार केले.