लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडच्या नुतन पदधिकाऱ्यांच्या निवडी

लोहारा : संभाजी ब्रिगेड धाराशिव जिल्हा प्रमुख शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकी मध्ये पक्ष संघटन आणि आगामी काळामध्ये येणाऱ्या विविध निवडणुकांविषयी विचारमंथन करण्यात आले.पक्ष विस्ताराविषयी आणि आगामी काळामध्ये पक्षाची वाटचाल कशी असेल यावर पक्ष निरीक्षकांनी तालुक्यातून आलेल्या सर्व प्रमुख,पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. व तसेच “गाव तेथे शाखा घर तिथे कार्यकर्ता” या उपक्रमा अंतर्गत मा.शरद पवार साहेब यांच्या हस्ते नुतुन पदाधिकाऱ्यानां हॉटेल पुष्पक पार्क धाराशिव येथे पद नियुक्ती पत्र देण्यात आले… शिवश्री भालचंद्र शिंदे यांची संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका उपाध्यक्ष पदावरती निवड करण्यात आली. शिवश्री दयानंद चव्हाण यांची संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका सचिव पदावरती निवड करण्यात आली. शिवश्री विशाल गोरे यांची संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका कोषाध्यक्ष पदावरती निवड करण्यात आली. या सर्वांना नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning

यावेळी उपस्थित मान्यवर संभाजी ब्रिगेड का आ जिल्हा अध्यक्ष धनराज बिराजदार संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका प्रमुख बालाजी भागवत यादव संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील गुंड संभाजी ब्रिगेड का आ लोहारा तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड लोहारा तालुका महासचिव लक्ष्मण पवार संदेश जाधव शुभम पवार विद्यासागर कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!