जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत RO PLANT

लोहारा : लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी 77 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत, सामाजिक ॠणाची भावना जपत तुकाराम सुभाष सांळुके यांनी मुलगी गायत्री तुकाराम सांळुके हिची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुंबई येथे निवड झाल्याबद्दल तसेच स्वर्गीय माजी सरपंच मन्मथ ( राजु) सदाशिव पाटील यांच्या स्मरणार्थ सरपंच सागर पाटील व जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक यांच्या सहकार्यातुन शुद्ध पेयजल पुरवठा करणारा RO PLANT बसवण्यात आला.याचे उद्घाटन जेष्ठ नागरिक सुभाष सांळुके व सरपंच सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी उपसरपंच इंद्रजित लोभे,बसवराज पाटील,शेषराव थोरात,संग्राम पाटील, प्रविण पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष वीरभद्र पाटील, शंकर गुंड, तिम्मा माने, पोलीस पाटील तानाजी माटे,डॉ.गणेश धज ,धनराज हजारे, राजेंद्र हिंगमिरे, गणेश जगदाळे,मडोळाप्पा शेगजे,राजु शेख, विमल भंडारे, निलावती बंडगर, रुक्मिणी बनसोडे, मुख्याध्यापक पाशा शेख, रसुल शेख,संगीता सुर्यवंशी, वर्षा शेटकार, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्ती, बचत गट सदस्य व इतर नागरिक उपस्थित होते.