तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी सौ. संगीता अनिल पाटील यांची निवड

उमरगा : उमरगा तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी कोळसुर कल्याणी तालुका उमरगा येथील माजी सरपंच सौ संगीता अनिल पाटील यांची निवड करण्यात आली आहे या निवडीचे पत्र आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन बापुराव पाटील, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ संगीताताई कडगंचे, माजी नगरसेविका सौ ललिता सरपे, सौ जमिलाबी बेग, सौ. पद्माताई माळी, आकाश अनिल पाटील, आदी उपस्थित होते.