लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर शिक्षकाचे धरणे आंदोलन

 

HTML img Tag Simply Easy Learning

लोहारा :  लोहारा तालुक्यातील शिक्षकांची प्रलंबित कामे, अपमानास्पद वागणूक व मनमानी कारभाराबाबत बुधवारी दि. 02/08/2023 रोजी पंचायत समिती लोहारा येथे 11 ते 4 या वेळेत धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

 

संदर्भ

1. यापुर्वी दि. 14/03/2023 रोजी दिलेले निवेदन.

2. दि. 25/07/2023 रोजी दिलेले निवेदन.

वरील संदर्भिय विषयी विनंती की, आम्ही खालील सहया करणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा – लोहारा अशी विनंती करतो की, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोहारा है आम्हा कर्मचा-यास अपमानास्पद वागणूक देत आहेत. व आम्हाला त्रास होत आहे. करिता आम्ही दिनांक 02 / 08 / 2023 वार बुधवार रोजी पंचायत समिती लोहारा येथे 11 ते 4 या वेळेत धरणे आंदोलन करत आहोत. त्यांच्या कामाच्या बाबतीत खालील खुलासा करित आहोत..

1. सेवानिवृत्ती प्रकरणाबाबत – कै. जाधव के.एस. प्रा. प. प्रा.शा. सास्तुर यांचे निधन झाल्यानंतर त्यांची कार्यवाही कार्यालयास वेळेवर सादर करुन ही जिल्हा परिषदेकडे विहीत वेळेत सादर केली जात नाही. तसेच एप्रिल 2023 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणारे कर्मचारी श्री पोतदार डी.बी. यांचे नादेय प्रमाणपत्र व सेवानिवृत्त प्रकरणाची संचिका माहे जानेवारी 2023 या महिन्यात कार्यालयात सादर करुन ही अद्याप पर्यंत नादेय प्रमाणपत्र मिळत नाही. करण्यासाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री जावळे एस वाय हे गेले असता त्यांना आपण वकिली करायची नाही असे म्हणतात व You Can Go असे तीन वेळा म्हणाल्या. यावर अध्यक्ष यांनी शिक्षकांची कामे वेळेवर होत नाहीत म्हणुन अध्यक्ष या नात्याने आम्हाला यावे लागते. व आपण आम्हास अशी वागणूक देता का ?

2. रजा मंजूरी बाबत – या तालुकाअंतर्गत शिक्षक अर्जित रजेवर गेले असता रजा मंजूर करणेसाठी सात दिवसानंतर यावे असे सांगतात. व त्यांना कार्यालयातून जावा असे म्हणतात. ( श्रीमती दंतकाळे एन.डी., श्री पोतदार डी.बी., श्री पानढवळे एच.वाय., श्री रोकडे एस व्ही ) तसेच अर्जित रजा आगाऊ मंजूरीसाठी मागणी केली असता तसा नियम नाही असे सांगुन ते मी मान्य करत नाही असे म्हणतात.

3. भ.नि.नि. प्रस्तावाबाबत – लोहारा तालुक्यातील शिक्षक हे मुला-मुलींच्या लग्न कार्यासाठी, शैक्षणिक अथवा वैद्यकिय कारणासाठी भविष्य निर्वाह निधीची प्रस्ताव सादर करुन पुर्ण करण्यासाठी विनंती केली असता सात दिवसानंतर प्रस्तावावर सह्या होतील असे उत्तरे देतात. त्यामुळे शिक्षकांची आर्थिक हेळसांड होत आहे.

4. वैद्यकिय बिलाच्या प्रस्तावाबाबत लोहारा तालुक्यातील शिक्षकांचे वैद्यकिय प्रतीपुर्ती चे प्रस्ताव सादर करुन ही पंधरा वीस दिवस प्रस्तावावर स्वाक्षरी करत नाहीत. व विचारणा केलेल्या शिक्षकास अपमानास्पद बोलतात. त्यामुळे पुर्वीच आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षक कर्मचारी व कुटूंबास मानसिक त्रास होत आहे.

5. विद्यार्थी स्पर्धेबाबत माहे डिसेंबर जानेवारी या महिन्यात विदयार्थ्याच्या शालेय क्रिडा स्पर्धा बीटस्तरावर घेण्यात आल्या. त्या स्पर्धेसाठी सर्व शिक्षकाकडून 100 रुपये निधी गोळा करुन बीटस्तरावरील स्पर्धा घेण्यात आल्या. व विदयाथ्यांना प्रमाणपत्र व पारितोषिक बीटस्तरावर वितरीत करण्यात आले. परंतू तालुका क्रिडा स्पर्धेसाठी पारितोषिक वितरण व प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले नाही. निधी प्राप्त झाल्यानंतर ही विद्यार्थ्यांना मुलांचा गुणगौरव करण्यात आला नाही. मग निधी कशासाठी खर्च केला गेला याचा बोध होत नाही.

बीट स्तरावरील स्पर्धा चालु असताना प्रा.शा. दस्तापुर येथील एक विद्यार्थी कुस्ती खेळत असताना पायाला दुखापत झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांची परिस्थिती हलाखीची असल्या कारणाने उपचारासाठी म्हणुन स्वच्छेने शिक्षकांनी निधी द्यावा असे आवाहन शिक्षक संघटना व शिक्षकांनी केले. व जमलेल्या निधीमधून विद्यार्थ्याचा दवाखान्यातील खर्च भागवल्यानंतर उर्वरित रक्कम संबंधित पालकांना पुढील उपचारासाठी न देता श्री अमिलपुरे या शिक्षकास सांगुन तो निधी आपल्याकडे जमा करुन घेतला. तो अद्याप वाटप करण्यात आलेला नाही. या मागचा हेतू काय आहे ?

6. शिक्षक पुरस्काराबा शिक्षक पुरस्कार हा 5 सप्टेंबर 2022 रोजी करणे अपेक्षित असताना संबंधितास विनंती करुन ही आजपर्यंत हा तालुकास्तरीय शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम घेण्यात आलेला नाही.

7. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन सन 2022-23 विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी स्वतः खर्च करुन साहित्य निर्मिती करुन प्रयोगाचे साहित्य तयार केले व सादरीकरण केले. क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचे गुणगौरव व

कौतुकाचा कार्यक्रम करण्यात आला नाही. तसेच पर्यवेक्षक व शिक्षक यांचे देखील गुणगौरव करण्यात आले नाही.

कार्यालयातील कर्मचारी, तालुक्यातील शिक्षक कर्मचारी तसेच तालुक्यातील संघटना पदाधिकारी यांच्याशी नेहमी अपमानास्पद व असभ्य बोलून संबंधितास अपमानित करतात. व महाराष्ट्र बिले दाखल केली असता त्यातील मुळ कागदपत्रे काढुन घेतली राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे पुरवणी जातात. व बिलावर त्रुटी लिहून बिले परत केली जातात. व त्यांच्याशी असभ्य वर्तन करुन जाणीवपूर्वक त्रास देतात. त्याचे उदाहरण महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ लोहारा हे आहे.

सदरील बाबीचा विचार केला असता श्रीमती मैदर्गी आर सी प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोहारा यांचे शिक्षकाशी वर्तन चांगले नसून लेखी नोटीस देणे व त्रास देणे एवढीच का यांच्याकडुन होत आहेत. यांनी पदभार घेतल्यापासुन या तालुक्यातील कार्यालयाची व शिक्षकाची शिस्त बिघडलेली दिसून येते. तसेच तालुक्याच्या गुणवत्तेवर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम दिसून येत आहे. सदरील व्यक्ती ही या पदास कार्यक्षम नाही असे म्हणावे लागेल. व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांची 31 मे 2023 रोजी जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे बदली झाली असुन त्या पदावर उपस्थित झालेले आहेत. त्यांच्याकडील लोहारा गटशिक्षणाधिकारी या पदाचा पदभार अद्यापपर्यंत बदलण्यात आलेला नाही.

 

करिता मा. साहेबांना विनंती की, यांच्याकडील प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती लोहारा या पदाचा पदभार दि. 01/08/2023 पर्यंत काढण्यात यावा. असे आम्ही दि. 25/07/2023 रोजी निवेदन दिले होते. परंतू त्यांच्याकडील पदभार दि. 01/08/2023 पर्यंत ही काढण्यात आलेला नाही.

म्हणुन आम्ही बुधवारी दि. 02/08/2023 रोजी पंचायत समिती लोहारा समोर धरणे आंदोलन करण्यात आले आहे.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, सरचिटणीस विठ्ठल माने,तालुकाध्यक्ष सुदर्शन जावळे,विजयकुमार ओवांडकर, डि. डि. कदम, प्रशांत मिटकर यांनी मनोगत व्यक्त करीत गटशिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभारबाबत नाराजी व्यक्त करीत अन्यायाविरुद्ध शिक्षकांनी लढण्यासाठी नेहमी सज्ज रहावे. जिल्हा संघ योग्य पाठपुरावा करेल.या आंदोलनाला ग्रामसेवक तालुका व जिल्हा संघटनेना,प्रहार शिक्षक संघटनेने पाठींबा दिला.यावेळी लोहारा तालुका शिक्षण विभागातील कार्यालयीन वि. अ. शि भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे, गजानन मक्तेदार,नंदकुमार पोटरे,नयन शेख,विश्वजित चंदनशिवे,गोखले मामा,केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे,मधुकर रोडगे,एकनाथ शिंदे, विश्वजीत चंदनशिवे महिला आघाडी तालुकाध्यक्ष वर्षा चौधरी,निर्मला दंतकाळे, गितांजली मोटे, ज्योती पाटील,अर्चना साखरे, मेघराज कदम, नितीन वाघमारे, सचिन मक्तेदार,दिपक पोतदार, जिवन गायकवाड, राम मुसांडे, सूर्यकांत पांढरे,विकास घोडके, बालाजी आलमले, राहुल ओवांडकर, रफीक शेख, रसुल शेख, कोंडीबा कारभारी, शिवाजी साठे, बाबासाहेब कदम, प्रविण साळुंके,राजू माळवदकर,मच्छिंद्र बोकडे,विनोद नन्नवरे, दाजीबा साबळे, मारूती ढोणे,प्रविण शिंदे,गहिनीनाथ माने, सुधीर घोडके,व्यंकट पोतदार, के.एस.गायकवाड यांच्यासह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!