मंडळ अधिकारी जगदिश लांडगे व डॉ.आम्लेश्ववर गारठे यांचा सत्कार

इक्बाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील जगदिश लांडगे यांची जिल्हा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद भुसंपादन विभागात मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाल्याबद्दल व सोमेश्वर मल्टिप्लेशालटी हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ.आम्लेशवर गारठे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापुन मिलाप मित्र मंडळाच्यावतीने शहरातील सोमेश्वर मल्टिप्लेशालटी हॉस्पिटल येथे या दोघांचा संयुक्त यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, इस्माईल मुल्ला, जब्बार मुल्ला, मिलाप मित्र मंडळाचे अध्यक्ष दादा उर्फ रहेमान मुल्ला, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, सोमनाथ माळी, संजय दरेकर, लक्ष्मण रसाळ, संभाजी बनसोडे, डी.डी.जाधव, सुरज थोरात, शाम रोडगे, योगेश गिरी, मुकेश कदम, संजय कदम, आदि उपस्थित होते.