संभाजी ब्रिगेडच्या लोहारा तालुका कार्याध्यक्षाची निवड जाहीर

उस्मानाबाद : संभाजी ब्रिगेडच्या लोहारा तालुका कार्याध्यक्षपदी अभिजित सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.
याप्रसंगी नियुक्तीचे पत्र संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक धनराज बिराजदार व पञकार अब्बास शेख यांच्या हस्ते शुक्रवारी २१ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता देण्यात आले आहे. यावेळी संभाजी ब्रिगेडचे लोहारा तालुकाध्यक्ष बालाजी यादव, तालुका उपाध्यक्ष शरद जावळे, तालुका सचिव लक्ष्मण पवार,करजगाव शाखा सचिव प्रितम जावळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.