रविवारी रावेत मध्ये रंगणार दिवाळी संध्या

चिंचवड : ( प्रतिनिधी )
अनेकदा आयुष्यात काहीतरी करायचं राहून जातं असं वाटत असतं आणि त्यातच आपल्यासाठी आपलं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणारं काहीतरी घडलं तर त्यासारखी आनंदाची गोष्ट नसते. असाच आनंद रविवारी २३ ऑक्टोबरला गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या काही गायकांना मिळणार आहे. कारण रावेत भागातील नवोदित गायकांसाठी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या एम बी म्युझिक ग्रुप दिवाळी संध्या शो घेऊन आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
२३ ऑक्टोबर रविवारी हा नवीन सिंगिंग रिऍलिटी शो सादर होणार असून या शोद्वारे स्वत:ला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी काही गायकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे रावेतच्या इतिहासात पहिल्यांदाच नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning

या शोचा सोहळा रविवारी सायंकाळी ७ वाजल्या पासून रावेतकरांना अनुभवायला मिळणार आहे. नवोदितांचे जबरदस्त परफॉर्मन्सेस आणि रावेतच्या कानाकोपऱ्यातून शोधलेलं अफलातून टॅलेण्ट असा सुरेख मेळ या शोच्या निमित्ताने जुळुन आलाय. त्यामुळे २३ ऑक्टोबरचा रविवार रसिक प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थाने पर्वणी ठरणार आहे.

दिवाळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करताना दिवाळी पहाट आणि दिवाळी संध्या कार्यक्रमांना खास महत्त्व असते. स्वरसंगीताने दिवाळीची पहाट आणि संध्या मंगलमय केली जाते. दोन वर्षे कोरोना संकटामुळे दिवाळी पहाट अथवा संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते. यावर्षी मात्र कोणतेही निर्बंध नसल्याने कार्यक्रम करण्यास अनुमती आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त रविवार २३ ऑक्टोबर रोजी रावेत सुरोत्सव उत्सव सुरांचा दिवाळी संध्या कार्यक्रम आठवडे बाजार मैदान, रावेत प्राधिकरण येथे आयोजित केला आहे.
दर वर्षीप्रमाणे यंदा रावेत वासियासाठी दिवाळी निमित्त दिवाळी संध्या सुरमयी करण्यासाठी सुरांची रेलचेल घेवून आलो आहे. यंदाच्या दिवाळीनिमित्त रविवार २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता रावेत परीसरातील नवोदित गायकांनी एम बी म्युझिक ग्रुपच्या माध्यमातून मराठी,हिंदी गाण्याच्या सुरेल मैफलीतून मंत्रमुग्ध करणार आहेत.सर्वांना या सुरेल मैफिलीचा आनंद मोफत उपलब्ध होणार आहे.
—–

🔴 अनेकांना गायनाची आवड असते परंतु संधी मिळत नाही.माझ्या रावेत प्रभागात अनेक नवोदित गायक आहेत त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे याकरिता एमबी म्युझिक ग्रुप तयार झाला आहे.या माध्यमातून नवोदितांना गाण्याची संधी प्राप्त झाली आहे.यामधून निश्चित नवीन चांगले गायक निर्माण होतील अशी मला आशा आहे.रावेत नगरी शहरातील सांस्कृतिक नगरी व्हावी यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.
मोरेश्वर भोंडवे
नगरसेवक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!