लोहारा शहरात संभाजी ब्रिगेडचा रास्ता रोको आंदोलन

लोहारा (जि.उस्मानाबाद ) : लोहारा ते आष्टामोड रस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज बुधवारी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजन करीत रास्तारोको आंदोलन केले.

लोहारा ते आष्टामोड या मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहानधारकांना मोठी कसरत करावी लागते. खड्ड्यांमुळे या मार्गावर अनेक अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाल्याने त्याची दुरूस्ती करण्याबाबत अनेक वेळा संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले होते. तरीही याकडे दुर्लक्ष केले गेल्याने अखेर आज संभाजी ब्रिगेडने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी दुपारी भजन करीत रास्तारोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्षवेधले.

या आंदोलनात भजनी मंडळ सहभागी होऊन त्यांनी भजन केले. संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष शरद पवार, जिल्हा सचिव अक्षय नरवडे, जिल्हा संघटक धनराज बिराजदार, तालुका अध्यक्ष बालाजी यादव, तालुका कामगार आघाडी अध्यक्ष किरण सोनकांबळे, शहर अध्यक्ष पद्माकर चव्हाण, तालुका विद्यार्थी आघाडी अध्यक्ष गणेश सुरवसे, उपाध्यक्ष स्वप्नील गुंड, शरद जावळे, लक्ष्मण पवार, खंडू शिंदे, गोविंद गोरे, ओमकार चव्हाण, विजय जाधव, अभिजित सूर्यवंशी, छगन फुलसुंदर आदी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!