श्री संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या पुण्यतिथी निमित्ता श्री क्षेत्र कानेगाव येथे नगरप्रदक्षिणा व पालखी सोहळा

लोहारा ( धाराशिव ) : लोहारा तालुक्यातील प्रति पंढरपूर श्री क्षेत्र कानेगाव येथे श्री संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या 27 व्या पुण्यतिथी निमित्ताने नगरप्रदक्षिणा व पालखी सोहळा आज मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये पार पडला.

HTML img Tag Simply Easy Learning

आज शनिवारी सकाळपासूनच प्रति पंढरपूर कानेगाव येथे भाविकांची मंदियाळी दिसून येत होती. पंचक्रोशीच्या गावातील श्री संत शिरोमणी सद्गुरू मारुती महाराज भक्तगन दिंडी घेऊन पोचले असता सकाळी ठीक 9 वाजता नगरप्रदक्षणा सोहळा ह.भ.प श्री ज्ञानेश्वर महाराज कानेगावकर यांच्या प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली सुरु होऊन त्याची सांगता सायंकाळी ठीक 6 वाजता झाली.

या पालखी सोहळ्यामध्ये गावातीलं महिला डोक्यावर कलश घेऊन मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या तसेच धनगरी ढोल, वारुवाले, बँजोवाले, वारकरी यांच्यासह मोघा,आरणी, भातागळी, नागूर,कास्ती, मार्डी, बेंडकाळ,हिप्परगा,धुत्ता,उजनी सह पंचक्रोशीतील सर्व भक्तगन गावकरी ग्रामस्थ या सोहळ्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

सोहळ्यात सहभागी भाविकासाठी गावातील सर्व युवक व ग्रामस्थांनी प्रत्येक चौकामध्ये चहा पाणी नाश्त्या व जेवणाची सोय केली होती,धाराशिव येथील साई परिवार ढोल पथकाने मिरवणुकीची शोभा वाढवली.

उद्या दिनांक 24-9-2023 पासून श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरीनाम सप्ताह चालू होणार असून 7 दिवस भजन कीर्तन हरिजागर काकडा आरती होणार असून या सप्ताह सोहळ्याची सांगता दिनांक 30-9-23 रोजी काला व महाप्रसादाणे होणार आहे या सोहळ्यामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटी व कानेगाव ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!