शैक्षणिक

न्यू व्हिजनच्या विद्यार्थांनी लुटला निसर्ग सहलीचा आनंद….

लोहारा ( जि.धाराशिव ) : दिनांक 21 डिसेंबर रोजी लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलची शैक्षणिक सहल श्री क्षेत्र अचलबेट आणि हिरकणी कृषी पर्यटन केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. या सहलीत पुर्व प्राथमिक विभागातील लहान चिमुकल्यांनी सर्वप्रथम उमरगा तालुक्यातील उंच डोंगरावर असलेले प्रसिद्ध तीर्थक्षेत्र अचलबेट याठीकानी भेट देवून येथील थोर संत ह.भ. प.उज्वलानंद महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

 

HTML img Tag Simply Easy Learning

यानंतर गुगळगाव येथील हिरकणी कृषी पर्यटन केंद्र याठिकाणी वन भोजनाचा आनंद लुटला.याठिकाणी लहान चिमुकल्यांनी स्विमिंग- पुल, रेन- डान्स, घसरगुंडी, झोके, सी – सॉ, मेरी गो राऊंड, जंपिंग- जपॉगं , दोरीवर चढने, हारडलस्, अवघड टायर व पायऱ्यावरून चालणे, अशा विविध प्रकारच्या खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला.

 

हि शैक्षणिक व निसर्ग सहल यशस्वी करण्यासाठी स्कुलचे मुख्याध्यापक श्री शहाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री सिद्धेश्वर सुरवसे, श्री व्यंकटेश पोतदार, मिस सविता जाधव, मिस मीरा माने, मिस वैशाली गोरे, मिस ईश्वरी जमादार, मिस अनिता मनशेट्टी, मिस सरिता पवार, मिस. सुलोचना वकील, मिस रेश्मा शेख, शीतल बिराजदार, या सर्वांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!