लोहारा शहरात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिनित्त अभिवादन

लोहारा ( उस्मानाबाद ) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिनित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लोहारा शहारात गुरुवारी १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करुन शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटील व पं.स.माजी सभापती विलास भंडारे यांच्या हस्ते मशाल पेटवुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष नाना पाटील,युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना शहरप्रमुख सलिम शेख, महेबुब गंवडी,माजी नगरसेवक शाम नारायणकर, पंडित बारगळ,कालिदास गोरे,बालाजी माशाळकर, बालाजी जाधव, कुंडलीक सुर्यवंशी,पिंटु गोरे,चेतन गोरे, तुळशिदास शिंदे,रघुविर घोडके,विजय फावडे,काका वाघमारे, बसय्या स्वामी, मल्लीनाथ पांचाळ,मैनुद्दिन शेख यांच्यासह शिवसैनिक ,युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.