ढोकी पोलीसांच्या सतर्कतेने दरोड्याचा कट टळला

उस्मानाबाद : ढोकी पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. जगदीश राऊत यांना दि. 15.11.2022 रोजी संध्याकाळी 21.05 वा. सु. गोपनीय माहिती मिळाली की, ढोकी गावातील तेरणा साखर कारखाण्याच्या मैदानातील निहाल काझी यांच्या पेट्रोलियम किरकोळ विक्री केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काही इसम माला विषयी गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. यावर ढोकी पोलीस ठाण्याच्या पथकाने लागलीच नमूद ठिकाणी छापा टाकला असता तेथे अशोक लेलँड वाहन क्र. एम.एच. 13 एएक्स 9252 सह दोन इसम मिळुन आले. पोलीसांनी त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपली नावे- 1)अनिल उध्दव चव्हाण, रा. राजेशनगर, ढोकी 2)फारुख कोतवाल, रा. ढोकी असे सांगीतले. पोलीसांना ते तेथे उपस्थित असण्याबद्दल संशय आल्याने त्यांनी त्यांच्या नमूद वाहनाची झडती घेतली असता त्यात कटावण्या- 2, कटर- 1, लोखंडी कत्ती- 2, लोखंडी गज- 1, एका कॅरीबॅगमध्ये लाल रंगाची चटणी पवडर व एक बॅटरी असे साहित्य मिळुन आले. यावर ते दरोड्याच्या तयारीत असल्याची पोलीसांना खात्री झाल्याने त्यांनी त्या दोघांकडे कौशल्यपुर्ण अधिक तपास केला असता त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह तडवळा ते एडशी रस्त्यावरील तेरणा पुलाजवळ रस्ता खराब असल्याने येणारी- जाणारी वाहने आडवून लुटणार असल्याचे सांगीतले. यावर पोलीसांनी नमूद वाहनासह दरोड्याच्या तयारीतील साहित्य असा एकुण अंदाजे 3,02,050 ₹ माल जप्त करुन नमूद दोघांना अटक केली. सदर प्रकरणी ढोकी पो.ठा. चे सपोफौ- सातपुते यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 399, 402 अंतर्गत गुन्हा क्र. 369/2022 हा नोंदवला आहे. तसेच गुन्ह्याती त्यांच्या उर्वरित साथीदारांचा पोलीस शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि- श्री. जगदीश राऊत हे करत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळंब उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. जगदीश राऊत यांसह पोउपनि- श्री. गाडे, सपोफौ- सातपुते, पोना- क्षिरसागर, तरटे, पोकॉ- गोडगे, पाडे यांच्या पथकाने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!