प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रेरणा सहकार पॅनलचे वर्चस्व

चिंचवड : (प्रतिनिधी )
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव येथील नामांकित प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या २०२२ ते २०२७ या पंच वार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रेरणा सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १० उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. नवी सांगवी येथील संस्कृती लॉन्स येथे सोमवारी मतमोजणी झाली.
प्रेरणा को-ऑप. बँक लि. ची संचालक मंडळाकरीता सर्वसाधारण मतदार संघातील १० जागांसाठी रविवारी निवडणूक संपन्न झाली होती. निवडणुकीकरीता ११ उमेदवार रिंगणात होते.बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन कांतीलाल गुजर यांच्या नेतृत्वाखाली तुकाराम गुजर, कांतीलाल गुजर, श्रीधर वाल्हेकर, गबाजी वाकडकर, सुरेश पारखी, संजय पठारे, संतोष मुंगसे, अॅड. अजितकुमार जाधव, नाना शिवले, सी. ए. नंदकिशोर तोष्णीवाल हे प्रेरणा सहकार पॅनलचे सर्वच्या सर्व १० उमेदवार विजयी झाले.

तुकाराम गुजर यांच्या विचारांचे राखीव मतदारसंघातील पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अक्षय गुजर (इतर मागास प्रतिनिधी), राजेंद्र शिरसाठ (भटक्या जाती जमाती), राजाराम रंदिल (अनुसूचित जाती जमाती), सुजाता पारखी व चंद्रभागा भिसे (महिला प्रतिनिधी) यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण साकोरे यांनी काम पाहिले.

          🔻विजेत्यांना मिळालेली मते🔻

०१. बारणे अक्षय आनंदा (१३५)

०२. गुजर कांतीलाल तुकाराम (३२५२)

०३. गुजर तुकाराम लक्ष्मणराव ( ३२६५)

०४. जाधव अजितकुमार दिनकर (३२४०)

०५. मुंगसे संतोष वासुदेव ( ३२४९)

०६. पठारे संजय संतुराम (३२७३)

०७. पारखी सुरेश नानाभाऊ (३२३९)

०८. शिवले जगन्नाथ उर्फ नाना कोंडीबा (३२३५)

०९. तोष्णीवाल नंदकिशोर जमनालाल (३२२५)

१०. वाकडकर गबाजी भिवाजी (३२३९)

११. वाल्हेकर श्रीधर धोंडीराम (३२०६)

एकूण वैध मतपत्रिका संख्या :- ३३१५ एकूण अवैध मतपत्रिका संख्या: ५७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!