तावशीगड येथे बांधावरती फळबाग लागवड कार्यक्रमाचा शुभारंभ

लोहारा : लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील सामाजिक कार्यकर्ते धीरज घोटाळे यांच्या संकल्पनेतून तावशीगड परिसरातील जवळपास ९० हेकटर जमिनीच्या बांधावर फळबाग लागवडीचा शुभारंभ तसेच तसेच ४० शेतकऱ्यांना मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीचे प्रशासकीय मान्यता आदेश वाटप या कार्यक्रमाचा आमदार ज्ञानराज चौगुले व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत शनिवारी २४ जुन रोजी शुभारंभ करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते,पोलीस निरीक्षक अजित चिंतले, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एस. परचंडे, कार्यक्रमाचे आयोजक धीरज घोटाळे, शेतकरी सेना जिल्हा संघटक विलास भगत, शाहूराज माने, सरपंच मधुमती पाटील, अभिमान खराडे, बालपिर शेख, फजल कादरी, बापू बिराजदार, महेश घोटाळे, राम मडोळे, यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य बालाजी विद्यालय, तावशीगड, जि.प.प्रा.शाळा, तावशीगड येथील सर्व विद्यार्थी व शिक्षकगण उपस्थित होते.