दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने वसीया मुल्ला हिचा राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार

लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील हायस्कूल लोहारा शाळेतील व अष्टविनायक क्लासेसची विद्यार्थिनी वसीया मुल्ला हिने दहावी बोर्ड परिक्षेत 90 % गुण मिळवुन घवघवीत यश संपादन केल्याने या मुलीचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच अष्टविनायक कोचिंग क्लासेसचे संचालक अमित बोराळे यांचाही पालक जब्बार मुल्ला परिवार व बालाजी सोमवंशी परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश दाजी बिराजदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, नगरसेवक जालिंदर कोकणे,
मुरुम बाजार समिती संचालक नेताजी कवठे, हाजी बाबा शेख, ठाकरे गट युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, भाजपा तालुका सरचिटणीस तथा जिल्हा मराठी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, लोकवाचनालयाचे ग्रंथपाल संजय जेवळीकर, विकास घोडके, पालक जब्बार मुल्ला, बालाजी सोमवंशी, मल्लिनाथ घोंगडे, तलाठी शिवाजी गलांडे, स्वप्नील माटे, गोपाळ माने, सुशांत माशाळकर, श्रीकांत बोराळे, अदि, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास घोडके यांनी केले तर आभार अष्टविनायक क्लासेसचे अमित बोराळे यांनी मानले.